SIDDHAGIRI MATHAM EVENTS

Karagir Mahakumbha

31 Mar

DateTue 31 Mar 2026 - Sat 04 Apr 2026

Time09:00 AM to 06:00 PM

सिद्धगिरी कारागीर महाकुंभ हा पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने दिनांक 31 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीमध्ये सिद्धगिरी कनेरी मठ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

सिद्धगिरी कारागीर महाकुंभ करण्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश हा आहे की आत्ता भारतामध्ये खास करून कारागिरांसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळावा, एक वेगळं व्यासपीठ मिळावं की जेणेकरून त्यांच्या कलेची माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचावी व त्यांच्या कलेच्या माध्यमातून ज्या विविध प्रकारच्या वस्तू, जी उत्पादने येत आहेत, तर त्याचा जास्तीत जास्त या ठिकाणी उपयोग येणाऱ्या व्यक्तींना, समाजाला कसा या ठिकाणी घेता येईल आणि त्याचप्रमाणं कारागिरांना त्यांच्या या विविध जे काही कला आहेत किंवा जी हस्तकला आहे याच्यामध्ये अजून कोणत्या प्रकारची मागणी, कोणत्या प्रकारची सुधारणा खास करून त्यांच्या उत्पादनामध्ये आवश्यक आहे याची त्यांना जाणीव व्हावी आणि साधारणतः यामुळे भारतातील काही लोप पावलेल्या कला आणि त्याचप्रमाणे आत्ता आधुनिकतेची जोड असलेल्या कला याची माहिती व्हावी, हा याच्यातला महत्त्वाचा भाग आहे.

या सिद्धगिरी कारागीर महाकुंभामध्ये साधारणतः 200 हून अधिक कारागीर सहभागी होत आहेत. खास करून भारताच्या हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट मधून, ज्याला वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या खाली एक हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट काम करतं, हस्तकला विभाग, तर त्याच्यामार्फत या ठिकाणी बरेचशे कारागीर उपस्थित राहत आहेत. त्याचसोबत नाबार्ड असेल, खादी ग्रामोद्योग असेल, त्याचप्रमाणे निफ्ट असेल, त्याच्यानंतर कारागिरांसाठी काम करणाऱ्या काही सामाजिक संस्था आणि व्यक्ती असतील.

याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे सर्व राज्यांमधून कारागीर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्याचा उल्लेख करावा लागेल, एक तर म्हणजे महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटक, गुजरात, गोवा, आसाम, मणिपूर, मेघालय, त्याचप्रमाणे नॉर्थ कडून उत्तर प्रदेश, नंतर पंजाब, मध्य प्रदेश आणि अन्य अनेक राज्य या ठिकाणी येत आहेत की जेणेकरून या राज्यातल्या वेगवेगळ्या कला आपल्याला बघायला मिळणार आहेत.. राभरी आर्ट, पिंगुळी कला, भिल्ल वर्क

याच्या व्यतिरिक्त कर्नाटकामध्ये कसोटी, आपल्याकडे चर्मकलेमध्ये एक नवीन प्रकार आला आहे, तो लेदर पपेट.

याच्या व्यतिरिक्त पश्चिम बंगालमधून काही कारागीर येत आहेत. ते त्या ठिकाणी त्यांची जी वैशिष्ट्यपूर्ण अशी कारागिरी आहे, ती आपल्याला बघायला मिळेल. जरदोशी सारी ज्याला आपण म्हणतो बनारसची, तर ते बनारसचे कारागीर हे बनारसच्या साडीसाठी ओळखले जातात. तर त्यांची जी वेगवेगळ्या कला आहेत, त्यांच्या साडी वगैरे ज्या आहेत, त्या आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि एकंदरीतच आपल्याला याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कला, ज्या आपल्याला माहिती नाहीयेत त्या सगळ्या या ठिकाणी आपल्याला बघण्याची संधी मिळणार आहे.

लोककला

या महोत्सवामध्ये अजून एक सेगमेंट किंवा अजून एक विभाग जो जोडला गेला आहे, तो लोककलेचा आणि त्याचप्रमाणे खाद्यसंस्कृतीचा. या लोककलेचे वैशिष्ट्य असे आहे की, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक पारंपरिक अशा प्रकारच्या ज्या लोककला आहेत, ज्या लोप पावत चाललेल्या आहेत, लोकांना त्याची जाणीव नाही. ग्रामीण भागामध्ये त्याचा स्तर अतिशय कमी होत चालला आहे आणि म्हणून अशा सगळ्या लोककलांना लोकांच्या समोर पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणणे आणि या सादरीकरणातून लोकांना त्याच्यामधली त्याची रुची वाढवणे, हा एक महत्त्वाचा भाग या लोककलेच्या महोत्सवातून या ठिकाणी होणार आहे.

आणि हे होत असताना, साधारणतः आपल्या ज्या काही जुन्या कला आहेत, भुपाळी ते भैरवी. मग भुपाळी ते भैरवी म्हणजे काय? अगदी सकाळपासून ते भैरवीपर्यंत अशा वेगवेगळ्या कला ग्रामीण भागामध्ये आपण बघत असतो. त्याची माहिती आजच्या तरुण पिढीला नाही. आपल्याला वासुदेवची माहिती व्हावी, आपल्याला पिंगळ्याची माहिती व्हावी, आपल्याला त्या ठिकाणी जात्यावरची गाणी लक्षात यावीत, फुगडीचा जो खेळ आहे, तो लोकांना माहिती व्हावा, त्याच्यानंतर आपल्याला गणपतीच्या काळातले जे काही लोककलेचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते त्या ठिकाणी माहिती व्हावेत, भारुडची माहिती व्हावी, पोवाड्याची लोकांना माहिती व्हावी, त्याच्यानंतर कीर्तनाची माहिती व्हावी. या सगळ्या अनुषंगाने लोककलेला आपल्याला कसे प्राधान्य देता येईल आणि आपल्या स्थानिक कलाकारांना या माध्यमातून एक चांगला व्यासपीठ मिळेल.

खाद्यसंस्कृतीमध्ये

आता खाद्यसंस्कृतीमध्ये साधारणतः आपण नेहमी बघत असतो की वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या त्या ठिकाणी हॉटेल्समधून, वेगवेगळ्या ठेल्यांमधून मिळत असतात. पण आपली जी पारंपरिक खाद्यसंस्कृती आहे, जे परंपरा धरून त्या ठिकाणी काही पदार्थ बनवत असतात, त्यांना या ठिकाणी व्यासपीठ मिळणार आहे. वेगवेगळे पदार्थ. मग त्याच्यामध्ये घावन हा तसा जुना प्रकार आहे. म्हणजे आंबोळी आणि घावन हे सहसा आपल्याला दिसत नाही. ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आप्पे या ठिकाणी तयार करताना दिसतील आपल्याला, डोशाचे विविध प्रकार दिसतील. थालीपीठ की जे आपल्याला मिळणार नाही. आपण बऱ्याच ठिकाणी आपण पिझ्झाकडे जातो. येणारा जो वर्ग आहे, त्या सगळ्या वर्गाला थालीपीठाचं महत्त्व मिळेल. मिसळ जरी ही कोल्हापुरात असली तरीसुद्धा एक पारंपरिक मिसळच्या भरपूर पद्धती आहेत. 100 हून अधिक प्रकारे मिसळ आपल्याला बनवता येते. तर तो एक भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर या अनुषंगाने, याच्यामध्ये जी खाद्यसंस्कृती आहे आपली, मग ती कोल्हापुरी खाद्यसंस्कृती वेगळी आहे, त्याच्यानंतर दक्षिण खाद्य भारतातील खाद्यसंस्कृती वेगळी आहे, उत्तर भारतातील खाद्यसंस्कृती वेगळी आहे. या प्रत्येक प्रदेशातील, प्रांतातील या सगळ्या महत्त्वाच्या खाद्यपदार्थांना एक चांगली त्या ठिकाणी संधी मिळावी.